Climate Change Communication Toolkit

मानवाच्या कृत्यांमुळे घडणार्‍या हवामान बदलांविषयी पुरेशी माहिती आहे. कोळसा आणि तेल यांसारख्या नैसर्गिक इंधनांचा वापर, जंगलतोड आणि कचरा डेपोमध्ये कचरा टाकणे यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. ह्यात कार्बन डायॉक्साइड (CO2), मिथेन (CH4), नायट्रस् ऑक्साइड (N2O), सल्फर हेक्जाफ्लोराइड (SF6), हेलोकार्बन्स (हायड्रोफ्लुरो कार्बन्स (HFCs), आणि पर-फ्लुरोकार्बन्स् (PFCs) हे वायू असतात. असे वायू वातवरणात साठत जातात आणि कालांतराने वातावरणातील ही हरितगृह वायूंची चादर अधिक जाड होते. वातवरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण जसे वाढते तसा नैसर्गिक हरितगृह परिणाम बळावतो व अधिक उष्णता कोंडली जाते. ही अतिरिक्त उष्णता हवामानाच्या स्वरूपात लक्षणीय आणि दीर्घकालीन बदल घडवून आणते.

जागतिक हवामान बदलांचे पर्यावरणावरील परिणाम याविषयी पुरेसा वैज्ञानिक पुरावा आहे. गेल्या शतकात भारतात पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान 0.४ °C ने वाढले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे भारतातील हवामान-संबंधी दुर्घटनांची वारंवारिता आणि तीव्रता वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार, २00७-२00८ या वर्षात जगात घडलेल्या लक्षणीय दुर्घटनांमध्ये भारत तिसर्‍या क्रमांकावर होता -- कारण एकाच वर्षात भारतात १८ अशा दर्घटना घडल्या होत्या! हवामान बदलामुळे अधिक प्रमाणावर होणार्‍या जागतिक तापमानवाढीमुळे भारतासाठी याहून भीषण हवामानसंबंधी दुर्घटनांचे भाकित केले गेले आहे. अपेक्षित असलेली अतिवृष्टी, हिमकड्यांचे वितळणे आणि समुद्राच्या पातळीतील वाढीमुळे भारतीय हवामानावर अतिशय तीव्र परिणाम होतील असा अंदाज आहे ज्यामुळे पूर आणि वादळांच्या प्रमाणात वाढ होईल. भारतातील महत्वाची क्षेत्रे — कृषी, पाणी, नैसर्गिक परिस्थितिक व्यवस्था आणि जैवविविधता व मानवी आरोग्य — ही सर्व हवामानावर अवलंबून आहेत आणि म्हणून त्यांच्यावर देखील तीव्र परिणाम होऊ शकतात.

मुंबई महानगर क्षेत्राची व्याप्ती ४३५५ चौरस किलोमीटर असून ते उत्तर कोंकण समुद्रतटीय सखल प्रदेशाचा एक भाग आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे अरबी समुद्रापासून ते पूर्वेकडे पश्चिम घाटांच्या कड्यांपर्यंत (सहयाद्रीपर्यंत) पसरलेले आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई तसेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि उल्हासनगर यासारख्या वाढीच्या इतर ठिकाणांचा ह्या क्षेत्रात समावेश होतो.

त्यात ७ महानगरपालिका, १५ नगरपालिका आणि ९९५ गावं समाविष्ट आहेत. अंदाजे २१ दशलक्ष लोकसंख्या आणि खूप जास्त लाकेसंख्या दाटी असलेले हे क्षेत्र हवामान बदलांच्या परिणामांच्या दृष्टीने खूप अधिक भेदनीय आहे.

मुंबई महानगर क्षेत्र पश्चिम घाट आणि पश्चिम समुद्रतटीय क्षेत्र या भागात येतं. या क्षेत्रात १९७0च्या दशकाच्या तुलनेत २0३0च्या दशकात तापमान १.७ ०C ते १.८ ०C नी वाढेल असे भाकित केले गेले आहे. तसेच, २0३0च्या दशकात, १९७0च्या दशकाच्या तुलनेत, पावसाचे प्रमाण ६ ते ८ टक्क्यांनी वाढेल. जरी एकूण पावसाळी दिवसांमध्ये घट अपेक्षित असली तरी १ ते ५ दिवसांत पडणार्‍या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. पावसाची तीव्रता दिवसाला १ ते २ मिलीमीटरने वाढू शकते.

हवामानातील अशा कमालीच्या बदलांमुळे क्षेत्रातील शेतीवर परिणाम होतील आणि जलसिंचित तांदुळाच्या उत्पादनात ४ टक्क्यांनी घट होऊ शकते, आणि पशुधनावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. २0३0च्या दशकात, १९७0च्या दशकाच्या मानाने पाण्याच्या प्राप्तीत १0-५0 टक्क्यांनी घट होऊ शकते. मानवी आरोग्यावर प्रत्यक्ष परिणाम — जसे उष्णतेमुळे पडणारा ताण, आणि अप्रत्यक्ष परिणाम — जसे कीटकवाहित आणि जलवाहित रोगांचा फैलाव आणि कुपोषण, होऊ शकतात.

पण मोठी लोकसंख्या आणि आर्थिक साधनसंपत्ती असल्यामुळे हे क्षेत्र हवामान बदलाच्या विरोधातल्या कृतींचे केंद्रबिंदू बनू शकते. आतापर्यंत हवामान बदलाबाबत बरंच काही लिहिलं आणि बोललं गेलं आहे पण भारताच्या संदर्भातील कृती आणि साधनांचा अभाव आहे. हवामान बदल संबंधित साधने अशा कृतींना सुकर करायला विकसित केली गेली आहेत.

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26