Climate Change Communication Toolkit

मुंबई   मेट्रोपोलिटन   रीजन   एनव्हायरन्मेंट   इम्प्रूव्हमेंट   सोसायटी   (MMR-EIS)

अभ्यास, सर्वेक्षण, प्रात्यक्षिके, तपासणी, संशोधन आणि संबंधित उपक्रमांमधून, मुंबईचे पर्यावरण सुधारण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने १९९६ साली MMR-EIS ची स्थापना केली.

१९९६ सालापासून पर्यावरणावरील संशोधन, तंत्रज्ञानातील नवनिर्मिती, पर्यावरण- प्रकल्पांची अंमलबजावणी, जागरुकता निर्माण करणे आणि प्रशिक्षण, अशा अनेक क्षेत्रांमध्ये पर्यावरण-संबंधी सुधारणा घडवून आणण्यासाठी, विविध संशोधन संस्थांनी, NGOsनी, सरकारी संस्थांनी वगैरे राबवलेल्या अनेक प्रकल्पांना MMR-EIS ने साहाय्य केले आहे.

हवामान बदल आणि त्याचे परिणाम याच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता कमी करायला आणि बदलांशी जुळवून घ्यायला, नागरिकांपासून ते पॉलिसी-मेकर्सपर्यंत आणि विद्द्यार्थ्यांपासून ते औद्द्योगिक आणि व्यावसायिक कर्मचार्‍यांपर्यंत अशा वेगवेगळ्या भागीदारांना प्रोत्साहन देण्यासाठी, हवामान बदल साधने आणि टूलकिट या प्रकल्पाला MMR-EIS ने साहाय्य केले आहे.

MMR-EIS बद्दल अधिक माहितीसाठी बघा http://www.mmreis.org.in/

MOD_STATS_USERS : 8
MOD_STATS_ARTICLES : 26